नवी दिल्ली
केंद्र सरकार टाटा कम्युनिकेशनमधील आपली संपूर्ण हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. यामधील काही हिस्सेदारी ही ऑफर फॉर सेलच्या आधारे विक्री करणार आहे. ज्यामध्ये मुख्य हिस्सेदारीही टाटा सन्सच्या इन्वेसटमेंट आर्म पानाटोन फिनवेस्ट लिमिटेडला विकण्यात येणार आहे. अशी माहिती टाटा कम्युनिकेशनकडून रेग्युलेटरी फायलिंगमध्ये दिलेली आहे. सध्याच्या कालावधीमध्ये टाटा कम्युनिकेशन्समधील सरकारची हिस्सेदारी 26.12 टक्के आहे. जी पानाटोन फिनवेस्टजवळ 34.80 आणि टाटा सन्सजवळ 14.07 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड यांनी रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सरकारच्या हिस्सेदारीसह संशोधनावरील करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. सरकारजवळ टीसीएलचे 7.44 कोटींचे समभाग आहेत. मागील क्लोजिंग 1289.75 रुपये प्रति युनिट दराने सरकारला समभाग मूल्य 9,601 कोटी रुपयाच्या जवळपास असल्याची माहिती आहे.
ऑफर फॉर सेलच्या आधारे विक्री टीसीएलने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रारंभिक पातळीवर सरकार ऑफर फॉर सेलच्या मदतीने जवळपास 4.59 कोटी रुपयाची समभाग विक्री करणार आहे. ही विक्री सरकारच्या 16.12 टक्क्यांच्या हिस्सेदारी बरोबर राहणार असल्याचे संकेत आहेत.