मुंबई
कॉफी क्षेत्रात कार्यरत असणाऱया टाटा कॉफीने जूनला संपलेल्या तिमाहीत 77 टक्के इतका अधिक निव्वळ नफा कमावला असल्याचे समजते. दरम्यानच्या काळात कॉफीच्या विक्रीतही चांगली प्रगती दिसली आहे. कंपनीचा यावषीचा नफा 62 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागच्या वषी याच कालावधीत 35 कोटी रुपये इतका होता. कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्नही 26 टक्क्यांनी वाढून 592 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागच्या वषी याच कालावधीत ते 472 कोटी रुपये इतके होते. गेल्या काही महिन्यात विक्री व मागणी समाधानकारक राहिली आहे.