वृत्तसंस्था / मुंबई
ऑनलाइन ग्रोसरीच्या क्षेत्रात कार्यरत बिग बास्केटमधील वाटा खरेदी करण्याबाबत टाटा ग्रुपने पुढचा टप्पा गाठला असल्याचे सांगण्यात येत आहे. टाटा ग्रुप बिग बास्केटमधील 50 टक्के वाटा घेणार असल्याचे समजते.
दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भात पुढच्या टप्प्यावरची बोलणी झाली असल्याचे अधिकृत सूत्रांकडून कळते. पण यासंदर्भात कोणताही ठोस असा निर्णय अंतिम करण्यात आला नसल्याचेही स्पष्ट करण्यात येत आहे. मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंतच्या क्षेत्रात कार्य विस्तारणाऱया टाटा ग्रुपला बिग बास्केट वाटा विकण्याबाबत बोलणी करते आहे. बिग बास्केट सुमारे 50 टक्के वाटा विकण्याचा अंदाज बांधला जात आहे. हा वाटा 1 अब्ज डॉलर्सच्या व्यवहारात बिग बास्केटकडून विकला जाणार आहे, असेही समजते. दुसरीकडे चिनी इंटरनेट क्षेत्रातील अलिबाबाही बिग बास्केटमधील 26 टक्के हिस्सा विकणार असल्याचे समजते. गेल्या बऱयाच दिवसांपासून दोन्ही कंपन्यांमध्ये बोलणी सुरू असून त्यात प्रगती दिसते आहे.