मुंबई
ऊर्जा क्षेत्रात कार्यरत कंपनी टाटा पॉवर गुजरातमध्ये आपला ऊर्जा प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत कंपनीकडून 100 मेगावॅट क्षमतेची ऊर्जा तयार केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. गुजरात ऊर्जा विकास निगम लिमिटेडकडून यासंदर्भातले कंत्राट टाटा पॉवरने मिळवले असून ढोलेरा सोलार पार्क येथे नियोजीत प्रकल्प उभारला जाणार आहे. या ऊर्जा प्रकल्पातून सुमारे 246 दशलक्ष युनिटस्ची ऊर्जा वर्षाला तयार केली जाणार आहे.