वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड यांनी गुजरातच्या राघनेस्दा सोलर पार्कमध्ये 100 मेगावॅट उत्पादन क्षमता असणाऱया एका सौर प्रकल्पाची सुरुवात केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सदरच्या प्रकल्पात प्रति वर्षी कार्बन उत्सर्जनामध्ये 2,00,000 टनाने कपात होणार आहे. गुजरातच्या बनासकांठा जिल्हय़ामध्ये राघनेस्दा सोलर पार्क देशातील सर्वात मोठे सौर उद्यांनापैकी एक आहे. गुजरात ऊर्जा विकास निगमकडून हा प्रकल्प प्राप्त झाला आहे. ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून या कामात टाटा पॉवरचा हा सौरप्रकल्प महत्त्वाचे योगदान देणार आहे. 2022 पर्यंत भारताला 100 गिगावॅटची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता साध्य करायची आहे. त्यादृष्टीने सरकारकडून आपल्यापरीने उत्तेजना दिली जात आहे.