नवी दिल्ली
वीज वितरण करणारी कंपनी टाटा पॉवरने अलीकडेच बॅटरी स्मार्टसोबत भागीदारी जाहीर केली आहे. दुचाकी व तिचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीच्या स्वॅपिंग प्रणालीसाठी उभयतात भागीदारी झालीय. नवी दिल्लीत विविध भागात दुचाकी, तिचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या सोयीसाठी बॅटरी अदलाबदल केंदे स्थापन केली जाणार आहेत.