मुंबई
खासगी क्षेत्रातील ऊर्जा कंपनी टाटा पॉवर यांनी व्यावसायिक व रहिवासी बांधकाम प्रकल्पांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगकरीता बांधकाम क्षेत्रातील रुस्तमजी यांच्यासोबत भागीदारी केली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगकरीताची सोय उपलब्ध करणारी टाटा पॉवर ही सध्या दिग्गज कंपनी मानली जात आहे. आता त्यांनी अलीकडेच बांधकाम क्षेत्रातील कंपनी रुस्तमजी समूहासोबत भागीदारी केलीय. याअंतर्गत टाटा पॉवर रुस्तमजी यांच्या प्रकल्पांमध्ये इ-वाहनांच्या चार्जिंगची सुविधा उपलब्ध करणार आहे.