नवी दिल्ली
चालू आठवडय़ातील बुधवारच्या सत्रात नकारात्मक वातावरणातही टाटा पॉवरचे समभाग मजबूत कामगिरी करत आहेत. यामध्ये टाटा पॉवर लिमिटेडचे समभाग बुधवारी नकारात्मक स्थितीत 3.38 टक्क्यांनी वधारले आहेत. सकाळी 10 वाजता टाटा पॉवरचे समभाग 145 च्या जवळपास पोहोचले होते.
जागतिक बाजारामध्ये मोठी विक्री आणि एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांच्या समभागाचे भाव घसरल्याने सेन्सेक्सने बुधवारी सुरुवातीला 500 अंकांची घसरण नोंदवली आहे. टाटा पॉवरचे समभाग 52 आठवडय़ामध्ये उच्चांकी पातळीवर म्हणजे 145.40 वर राहिले आहेत. या समभागावर गुंतवणूकदारांना 5.41 टक्क्यांचा परतावा मिळाला आहे.