मुंबई : ऊर्जा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया टाटा पॉवरच्या निव्वळ नफ्यामध्ये वार्षिक तत्वावर 19 टक्के इतकी घट दिसून आली आहे. जानेवारी ते मार्च 2021 पर्यंतच्या कालावधीत टाटा पॉवरला 1445 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. जो मागच्या वर्षी समान कालावधीत 1779 कोटी रुपये इतका होता. कंपनीच्या महसुलामध्ये मात्र बऱयापैकी वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. कंपनीचा महसूल चौथ्या तिमाहीमध्ये 53 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी ओडिसा डिस्कॉम प्रकल्पाचे अधिग्रहण केलेले होते. त्यानंतर कंपनीचा खर्च काही प्रमाणात वाढला आहे.
Previous Articleआयएईएसोबतचा इराणचा करार संपुष्टात
Next Article इस्रायल-हमासचा संघर्ष, 72 जणांचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.