सध्या इव्हीमधील दोन मॉडेल उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा मोर्ट्सची नेक्सन इलेक्ट्रिकची (इव्ही) मागणी लक्षात घेत भारतात इव्ही स्पर्धेत जोरदारपणे उतरण्याची योजना टाटा कंपनी आखत आहे. टाटा नेक्सन इव्ही हे मॉडेल भारतामधील बेस्टसेलिंग म्हणून ओळखले जात आहे. यासह कंपनीची दुसरी मॉडेल कार टिगोर ईव्ही आहे. या दोन्ही कार भारतीय बाजारात खूप अगोदरपासून उपलब्ध आहेत, की जेव्हा काही कार कंपन्यांकडे एकही इव्ही कार नव्हत्या तेव्हापासून.
आगामी पाच वर्षांत टाटा चार कार बनविणार असून यामध्ये एक कार इलेक्ट्रिक राहणार आहे. यासोबतच 2025 पर्यंत कंपनी जवळपास 8 नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार असल्याची माहिती असून अगोदरपासून दोन कार उपलब्ध असल्याने एकूण 10 कार बाजारात टाटाच्या उपलब्ध होण्याची माहिती आहे.
टाटा मोर्ट्स सध्या फक्त 2 इलेक्ट्रिक मॉडेलच्या कारची विक्री करत आहे. यामध्ये टाटा नेक्सन इव्ही आणि टिगोर इव्ही यांचा समावेश आहे. कंपनीच्या इव्ही सेगमेंटच्या कारची विक्री वाढत असून ऑगस्ट 2020 मध्ये कंपनीने 306 कार्सची विक्री केली होती, तर जुलै 2021 मध्ये हा आकडा 604 वर पोहोचल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.
25 टक्के इतका वाटा
ईव्हीसोबत आगामी पाच वर्षात आपल्या पोर्टफोलियोत 25 टक्क्यांपर्यंतचा इव्हीचा वाटा असणार असल्याचा दावा टाटा मोर्ट्सचे वाहन युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी केला आहे.