वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी आर्थिक वर्षामध्ये देशातील वाहन निर्मिती कंपनी टाटा मोर्ट्सच्या व्यावसायिक वाहन उद्योगामध्ये 30 टक्क्यांची वाढ होण्याचे संकेत आहेत. मागणीमधील तेजी, आर्थिक गती यामुळेच या व्यवसायाला गती घेता येणे शक्य होणार असल्याचे टाटाने म्हटले आहे. ऑटो क्षेत्रात वाहनांची मागणी वाढत असल्याचे टाटाच्या अधिकाऱयांनी सांगितले.
कंपनीने हलक्या व्यावसायिक वाहनांची नवीन शेणी अल्ट्रा स्लीक टी-सीरीजचे सादरीकरण पेले आहे. ज्याची किमत एक्स शोरुम 13.99 लाख रुपयांपासून सुरु होणार आहे. सध्या आर्थिक सुधारणा मजबूत होत असून मागील तिमाहीमध्ये उत्पन्नात सकारात्मक वाढ झालेली आहे. याचा फायदा येत्या काळात उद्योग क्षेत्रास होणार असल्याचे टाटा मोर्ट्सचे अध्यक्ष गिरीश वाघ (वाणिज्यिक वाहन व्यापार) यांनी स्पष्ट केले आहे. कंपनीने मागील तीन वर्षांच्या अगोदर व्यावसायिक वाहनांची अल्ट्रा श्रेणी सादर केली आहे. याची बाजारामधील हिस्सेदारी ही 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहिली असून 20 हजारांपेक्षा अधिक वाहनांची विक्री करण्यात आली आहे. या वाहना ने व्यावसायिक गटातील वाहनांमध्ये चांगली लोकप्रियता कमावलेली आहे. येणाऱया काळातही या वाहनांना मागणी वाढेल.