नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्सने आपल्या अल्ट्रोज कारच्या बाबतीत एक विक्रम नुकताच प्रस्थापीत केलाय. कंपनीने हॅचबॅक प्रकारातील या कार्सचे 1 लाखावर उत्पादन घेण्यात यश मिळवलं आहे. 1 लाखाव्या अल्ट्रोज कारचे पुण्यातील कारखान्यात उत्पादन घेण्यात आले आहे. सदरच्या कार्सचे उत्पादन घेण्यास नोव्हेंबर 2019 मध्ये सुरूवात झाली होती. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये सदरची नवी गाडी बाजारात लाँच करण्यात आली होती. प्रिमीयम हॅचबॅक गटात ही गाडी दुसऱया नंबरवर राहिली आहे.