नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठी कंपनी टाटा मोटर्सला मार्च 31ला संपलेल्या चौथ्या तिमाहीअखेर 7 हजार 605 कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचे सांगण्यात येते. मागच्या वर्षी कंपनीने 9 हजार 894 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. कंपनीला सदरच्या कालावधीत 88 हजार 628 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करता आला आहे. मागच्या वर्षी समान कालावधीत कंपनीला 62 हजार 492 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. मागच्या वर्षाच्या तुलनेत महसूल 42 टक्के इतका वाढला आहे. 2020-21 आर्थिक वर्षात निव्वळ तोटा 13 हजार 395 कोटी रुपये नोंदला होता.