नवी दिल्ली
देशभरात आपल्या विक्रीचे जाळे आणि विस्तार योजना अधिक मजबूत करण्यासाठी टाटा मोर्ट्सने दिल्ली-एनसीआरमध्ये एका दिवसामध्ये 10 नवीन वाहनांची शोरुम्स सुरु केली आहेत. सदर शोरुम्समध्ये प्रवासी वाहनांची पूर्ण श्रेणी ठेवण्यात आली असल्याचीही माहिती कंपनीने दिली आहे.
विस्तार योजनेच्या अंतर्गत वाहन क्षेत्रातील प्रमुख कंपनी दिल्लीमध्ये सात, गुरुग्राम येथे दोन आणि फरीदाबाद या ठिकाणी शोरुम्स सुरु केली असल्याची माहिती कंपनीने मंगळवारी दिली आहे.
यासोबतच सदरच्या क्षेत्रात कंपनीने शोरुम्सची संख्या आता 29 झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. टाटा मोर्ट्सचे प्रवासी वाहन व्यवसायाचे विक्री विभागाचे अध्यक्ष राजन अंबा यांनी दिलेल्या माहितीनुसार मजबूत विक्रीच्या दरम्यान कंपनी विस्तार करण्याच्या तयारीत असून यासाठीच ही योजना आखली जात असल्याची माहिती आहे. दरम्यान आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 2019-20 च्या तुलनेत 69 टक्क्यांची विक्रीत वृद्धी नोंदवली आहे.