दिग्गज कंपन्या रिलायन्ससह ऍमेझॉनशी टक्कर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात प्रसिद्ध समूह म्हणून ऐतिहासिक कालावधीपासून टाटा समूहाची ओळख आहे. यामुळे सध्या रिलायन्स आणि ऍमेझॉन हे ई कॉमर्स क्षेत्रात नवीन सुरुवात करत देशात आपले वर्चस्व प्राप्त करण्याची तयारी करीत आहेत. परंतु यालाच टक्कर देण्यासाठी टाटा समूह सुपर ऍपचे सादरीकरण करणार असल्याचे समजते.
ऑनलाईन बाजारात रिलायन्स आणि ऍमेझॉनला टक्कर देण्यासाठी सुपर ऍपचे सादरीकरण येत्या डिसेंबरपर्यंत करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. या ऍपमधून खाण्यापिण्याच्या वस्तू, फॅशन आणि बदलत्या जीवनावर आधारीत बिल पेमेंटच्या सुविधेसोबत टाटा क्लिक, स्टार क्विक आणि इलेक्ट्रॉनिक प्लॅटफार्म क्रोमचाही समावेश राहणार असल्याचे टाटाने सांगितले आहे. मागील काही दिवसापासून देशातील व्यापाराची स्थिती आणि त्यासोबत बदलत जाणारी रणनीती यांच्या जोरावर विविध कंपन्या आपला मूळ अजेंडा बाजूला ठेवत आपल्या व्यवसायात बदल करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
लॉकडाऊन आणि कोविडच्या काळात देशातील दिग्ग्ज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ मार्ट आणि ऍमेझॉनच्या ई कॉमर्स व्यवसायाने आपले स्थान मजबूत करण्याची तयारी केली आहे. आता टाटाचे सुपर ऍप या दोन कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी मांडले आहेत.