मुंबई : बिग बास्केटमधील जवळपास 20 टक्क्यांची हिस्सेदारी टाटा समूह घेण्याचे संकेत आहेत. सोबत बिग बास्केटच्या संचालक मंडळावर दोन जागाही घेण्याची शक्यता आहे. ऑनलाईन ग्रॉसरी क्षेत्रातील बिगबास्केटसोबत हा व्यवहार चालू महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे. जर का सदरचा व्यवहार पूर्ण झाल्यास ऑनलाईन बाजारात जिओ मार्ट आणि ऍमेझॉन यांच्यात टक्कर होण्याची दाट शक्यताही सुत्रांकडून व्यक्त होत आहे.
बिग बास्केट मूळरुपात चीनच्या अलिबाबा समूहासोबत बांधील आहे. कोविड19 च्या कारणामुळे हा व्यवहार देशातील
कंपनीसोबत होत असल्याचे पहावयास मिळत आहे. नियमितपणे लागणाऱया घरगुती साहित्याची डिलिव्हरी ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे काम बिग बास्केटच्या अंतर्गत केले जात आहे.