तिमाहीत नफा 6 हजार 593 कोटींवर ः नफा 1600 टक्के वाढला
वृत्तसंस्था / मुंबई
पोलाद क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा स्टीलने मार्च 2021 ला संपलेल्या तिमाहीत भक्कम निव्वळ नफा कमावला असल्याचे सांगितले. कंपनीने मार्च तिमाहीअखेर 6593 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.
देशाच्या पोलाद उत्पादनातील वाटय़ात महत्त्वाची भूमिका टाटा स्टीलने निभावली आहे. मागच्या वर्षी मार्च 2020 मध्ये कंपनीने याउलट 437 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. म्हणजेच याची तुलना करता यावेळेच्या तिमाहीत कंपनीचा नफा हा जवळपास 1600 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. टाटा स्टीलच्या मंडळाने आर्थिक 2020-21 सालाकरिता प्रति समभागाचा लाभांश 25 रुपये देण्याची घोषणा केली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कंपनीचे प्रदर्शन चांगले झाले नाही. तरीही कंपनीने चांगली कमाई करून दाखविली आहे.
गुंतवणूकदारांना उत्तम परतावा
कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला आहे. टाटा स्टीलचा समभाग खरेदी करणाऱयांना एका आठवडय़ामध्ये 10 टक्के इतका अतिरिक्त परतावा मिळाला आहे. त्याचप्रमाणे एक महिन्यामध्ये गुंतवणूकदारांना 23 टक्के, तीन महिन्यामध्ये 56 टक्के आणि एक वर्षामध्ये 293 टक्के इतका जबरदस्त परतावा मिळाला आहे.