नवी दिल्ली
टाटा समूहाची रियल्टी फर्म टाटा हाऊसिंगने दिलेल्या माहितीनुसार कंपनी मालदीवमध्ये दोन लक्झरी घरांचा प्रकल्प विकसित करणार असून याकरीता जवळपास 270 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मालदीवमधील माले शहरामध्ये प्रस्तावित दोन प्रकल्पामध्ये 117 घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासोबतच दोन्ही प्रकल्पांना विमानतळाच्या जवळच विकसित केले जाणार आहे. यासोबत टाटा हाऊसिंगच्या संकेतानुसार मालदीवमध्ये एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पाचा प्रारंभ होणार आहे. मालदीव सरकारसोबत कंपनीने हातमिळवणी केली आहे.