नवी दिल्ली
घडय़ाळ क्षेत्रातील कंपनी टायटनच्या निव्वळ नफ्यात 37 टक्के इतकी घसरण झाली आहे. दुसऱया तिमाहीअखेरचा कंपनीचा निव्वळ नफा 199 कोटी रुपयांवर आला आहे. मागील वषी दुसऱया तिमाहीअखेर हा नफा 320 कोटी रुपयांचा होता. टायटन टाटा समूहाची कंपनी आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न 1.72 टक्क्याने घटून 4 हजार 389 कोटी रुपयांवर आले आहे. समान कालावधीत मागच्या वषी उत्पन्न 4 हजार 466 कोटी रुपये होते.