वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा समूहातील कंपनी टायटनने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांच्या मिळालेल्या प्रतिसादावर व मजबूत मागणीसोबत सणासुदीमुळे तिमाही दरम्यान (ऑक्टोबर ते डिसेंबर) कंपनीने जवळपास 36 टक्क्यांची वृद्धी प्राप्त केली आहे. कंपनीची ही कामगिरी तशी लक्षणीयच म्हणायला हवी.
कंपनीने आर्थिक वर्ष 2021-22 च्या दरम्यान तिमाहीत केलेल्या कामगिरीत आभूषणांची मागणी तेजीत राहिली. यासोबतच अन्य घटकांनाही ग्राहकांकडून मागणी राहिल्याचे चित्र दिसून आले आहे. कंपनीने तनिष्कच्या स्टोअर्सच्या नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखली असून यामध्ये जवळपास 14 दुकानांचा प्रारंभ करण्यात आला आहे. यात नवीन स्टोअर्स आता दुबईतही खुली केली असल्याची माहिती आहे. सदरच्या विक्रीमध्ये घडय़ाळ आणि परिधान करण्यात येणाऱया सुयोग्य अशा वस्तूंचा समावेश राहणार आहे.