टाेप/प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील टाेप महाडिक काॅलनी परीसरातील शुक्रवारी १० जुलैराेजी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या संपर्कात आलेल्या ५५ वर्षीय डॉक्टरांचा रिपोर्ट सोमवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला आहे. तर आज प्राप्त अहवालानुसार ट्रान्सपोर्ट व्यावसाईकाच्या संपकातील १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने अंशता दिलासा मिळाला आहे.
डॉक्टरांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. त्या डाॅक्टराच्या संपर्कात आलेल्याचा शाेध घेतला जात आहे.त्या डाॅक्टराच्या नमुद राेजनिशी नुसार २८ रुग्णाच्या संपर्कात आले आहेत.त्यांना तात्काळ क्वांरटाईन करण्यात आले आहे.तर आज प्राप्त झालेल्या अहवाला नुसार ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या संपर्कात आलेल्या १० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने थाेडा दिलासा मिळाला आहे.
डाॅक्टराच्या संपर्कातील काही रुग्ण कासारवाडी व संभापुर येथील आहेत. डाॅक्टरदि. ५ जुलै ते १० जुलै या कालावधीत ज्याचा संपर्कात आले आहेत. त्यांनी तात्काळ आराेग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आराेग्य सेवक एस.आर काबंळे यांनी केले आहे.