टाेप/प्रतिनिधी
आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार टाेप येथील एका ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना बाधित महिलाही भुये येथील पाहुण्याच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी गेल्या हाेत्या. गावातील मध्यवस्तीत असणार्या डाॅक्टरकडे उपचार घेत हाेती. त्यानंतर बावडा लाईन बझार दवाखान्यात उपचार घेतला आहे. त्या महिलेला अनेक जण भेटल्याची माहीती पुढे येत आहे. त्या महिलेला जास्त अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी दि. १५ राेजी रात्री उशिरा सी. पी.आर रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. आणखीन काेण काेण संपर्कात आले असल्याची माहिती गोळा करण्याचे काम आराेग्य विभाग कडून सुरू आहे.
दरम्यान याआधी एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व डाॅक्टर कोरोनाबाधित रुग्ण सापडले हाेते. त्यांच्या संपर्कात आलेल्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला हाेता. पण आज महिलेचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने पुन्हा भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. तात्काळ हा परीसर सील केला आहे. दक्षता म्हणुन औषध फवारणी ग्रामपंचायतीने केली आहे. तर शिराेली प्राथमिक आराेग्य केंद्राच्या वैद्यकीय आधिकारी जेसिका अॅन्ड्रुस यांनी भेट देवुन सुरक्षेबाबत सुचना दिल्या.