शहर मनसेचा आरोप, तातडीने झाडांची कत्तल थांबविण्याची मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
टिंबर मार्केट परिसरात बेकायदा वृक्षतोड सुरू करण्याचा गंभीर आरोप शहर मनसेने केला आहे. महापालिकेच्या जागेवर टिंबर मार्केट परिसरातील उद्योग उभारला असताना या ठिकाणी काही धनदांडग्यांनी विनापरवाना वृक्षतोड केली असून महापालिकेच्या यंत्रणेचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष झाले असल्याचेही मनसेच्या पदाधिकाऱयांचे म्हणणे आहे.
या प्रकाराबद्दल मनसेच्या वतीने मंगळवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना निवेदन देण्यात आले. टिंबर मार्केट परिसरात असणाऱया राष्ट्रीयकृत बँकेच्या जवळील खुल्या जागेत मोठी वाढ झालेले तीन वृक्ष तोडण्यात आले आहेत. एका एजन्सीकडूनही वृक्षाला इजा पोहचविण्यात आली आहे. त्याचबरोबर इतरही काही धनदांडग्या व्यक्तींनी झाडे तोडली आहेत. यापुढे या परिसरात कोणत्याही प्रकारची वृक्षतोड करण्यास मनाई करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनाव्दारे केली आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष सुनील तुपे, विजय करजगार, रत्नदीप चोपडे, राहुल भाट, प्रतीश माने, रोहित आवळे, विजय तडके, ओमकार घोरपडे, विशाल कांबळे, सुनील खाडे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त देसाई यांना निवेदन सादर केले.
घरफाळ्याविषयीही संशय
टिंबर मार्केट परिसरातील काही धनदांडग्यांकडून भरण्यात आलेल्या घरफाळÎातही गैरव्यवहार झाल्याचा संशय मनसेच्या पदाधिकाऱयांनी निवेदनात व्यक्त केला असून त्याच्या चौकशीचीही मागणी केली आहे.