ऑनलाईन टीम / बीजिंग :
‘टिकटॉक’चा अमेरिकेतील ओरॅकल आणि वॉलमार्टसोबतचा करार पूर्ण झाला आहे, असे टिकटॉक’ची मालकी असलेल्या ‘बाइटडान्स’ने जाहीर आहे.
‘बाइटडान्स’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेतील ओरॅकल आणि वॉलमार्टचा टिकटॉकसोबत करार पूर्ण झाला आहे. त्यानुसार ‘टिकटॉक’चे 20 टक्के समभाग या कंपन्या खरेदी करू शकतात. अमेरिकेतील टिकटॉक यूजर्सच्या डेटा सुरक्षेची जबाबदारी आता ओरॅकलची असेल. त्यामुळे अमेरिकेला असलेली यूजर्सच्या डेटा सुरक्षेची काळजी मिटेल.
टिकटॉक अमेरिकेतील आपला व्यवसाय वाढवून 25 हजार नोकऱ्यांची निर्मिती करणार आहे. ओरॅकल टिकटॉक कंपनीचा विश्वसनीय तंत्रज्ञान भागीदार म्हणून काम करेल. अमेरिकेतील टिकटॉक युजर्सची संख्या 10 कोटींच्या वर आहे.