ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत-चीन हिंसक संघर्षानंतर भारताने चीनच्या टिकटॉक या लोकप्रिय ॲपवर बंदी घातली. त्यानंतर टिकटॉकला पर्याय म्हणून इन्स्टाग्रामने ‘रिल्स’ या ॲपची निर्मिती केली आहे. पुढील महिन्यात जगभरातील 50 देशात हे ॲप लॉन्च करण्याचा इन्स्टाग्रामचा मानस आहे.
टिकटॉकची लोकप्रियता पाहता त्याच्या सर्व बाजू लक्षात घेऊन इन्स्टाग्रामनेही त्याला मिळते-जुळते असे रिल्स ॲप तयार केले आहे. भारताबरोबरच ब्राझील, जर्मनी आणि फ्रान्समध्ये या ॲपचा प्रायोगिक तत्वावर वापर होत आहे.फेसबुकनेही यापूर्वी टिकटॉकला पर्यायी लेस्सो हे ॲप तयार केले होते. मात्र, ते अपयशी ठरले.
रिल्स ॲपमध्ये पार्श्वसंगीतासाठी गाण्यांचा आणि संगीत रचनांचा प्रचंड साठा आहे. 15 सेकंदापर्यंतचे छोटे व्हिडिओ रेकॉर्ड आणि एडिट करता येणार आहेत. अनेक प्रकारची फिल्टर्स, काउंटडाऊन टायमरद्वारे व्हिडिओचा वेग बदलता येणार, रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करता येणार, यासारखी टिकटॉकमध्ये असलेली सर्व फीचर्स यामध्ये असतील.