पत्रकार जखमी : वादग्रस्त चित्रफितीचा मुद्दा
फैसलाबाद
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि पाकचे विज्ञान तसेच तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरी यांनी एका वृत्तनिवेदकालाच मारहाण केली आहे. मारहाणीमागे टिकटॉक स्टार हरीम शाह कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
फवाद चौधरी यांनी वृत्तनिवेदक मुबाशिर लुकमानला मारहाण केली आहे. सोहळय़ात उपस्थित लोकांनी दोघांना बाजूला करत मारहाणीचा प्रकार थांबविला आहे. निवेदकाने वादग्रस्त टिकटॉक स्टार हरीम शाहचा दाखला देत प्रश्न विचारल्याने मंत्री नाराज झाले होते.
हरिमने पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यालयात चित्रफित तयार करून प्रसिद्धी मिळविली आहे. पाकिस्तानात लोकप्रिय असलेली हरीम वादग्रस्त देखील आहे. हरीमने अलिकडेच पाकचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांची वादग्रस्त चित्रफित प्रसारित केली होती. रशीद यांनी अश्लील संदेश पाठविल्याचा आरोप तिने केला होता. इम्रान यांची चित्रफित प्रसारित करण्याची धमकीही तिने दिली आहे.