ऑनलाईन टीम / नोएडा :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आहे. सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नोएडा मधील एका तरुणाने टिक टॉक वर लाईक्स न मिळाल्याने आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत पावलेला तरुण केवळ अठरा वर्षांचा होता. या तरुणाने टिक टॉक वर व्हिडिओ तयार केला होता. मात्र या व्हिडिओ ला लाइक्स न मिळाल्याने या तरुणाने आत्महत्या केली. या तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे. लाईक्स न मिळाल्याने हा तरुण निराश झाला होता अशी माहिती पोलिसांना त्याच्या परिवाराकडून मिळाली आहे.