महाराष्ट्र-गोव्यात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी : 30 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. व्यक्तीचा असो किंवा समाजाचा असो शिक्षणामुळेच दोन्हींचा विकास होतो. हे निर्विवाद सत्य आहे. सरकारनेसुद्धा नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाजोगते शिक्षण घेणे शक्मय होणार आहे. त्याचवेळी कौशल्यावर आधारित शिक्षण घेण्यासाठीही त्यांना मुभा आहे.
विद्यार्थी घडविण्यामध्ये शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिक्षक घडविणाऱया संस्थांचे योगदानही महत्त्वाचे ठरते, अशीच एक शिक्षण संस्था म्हणजे मराठी टिचर्स ट्रेनिंग कॉलेज. पीयुसीनंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षक म्हणून आपल्याला सेवा करण्याची संधी मराठी टिसर्च ट्रेनिंग कॉलेज देते. या कॉलेजने आजपर्यंत अनेक शिक्षकांना तयार केले आहे. आतासुद्धा या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शिक्षक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होवू शकते. त्याचबरोबर मुलांना शिकविणे आणि त्यांना घडविणे असे कार्य आपण करू शकतो. अनुभव असल्याने खासगी शिकवणी घेणे शक्मय होते. याचबरोबर अंगणवाडीमध्ये निरीक्षक म्हणून किंवा साहाय्यक म्हणून आपण काम करू शकतो.
शैक्षणिक प्रवाह बदलूनसुद्धा अन्य क्षेत्रात आपल्याला उत्तम करिअर करता येते. लेखन कौशल्य असल्यास वेगवेगळय़ा विषयांचे वृत्तांकन करण्याची संधी मिळू शकते. स्तंभ लेखन, ब्लॉक लेखन करता येवू शकते. त्यामुळे एका अर्थाने मराठी टिचर्स ट्रेनिंग कॉलेज विद्यार्थ्यांना घडविणाऱया शिक्षकांना अनेक संधी उपलब्ध करून देते.
महाराष्ट्र व गोव्यात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी संधी असून येथे सीईटी व टीईटी तसेच इतर स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले जाते. शिक्षक प्रशिक्षणाची यशस्वी परंपरा असलेल्या या कॉलेजमध्ये व्यासंगी प्राध्यापक वर्ग आहे. कॉलेजची स्वतःची सुसज्ज अशी इमारत असून प्रयोगशाळाही आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थांमधील हे एक महत्त्वाचे कॉलेज असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ करून घ्यावा, असे आवाहन कॉलेजने केले आहे.
हे कॉलेज दुसऱया रेल्वेगेटजवळील हेरवाडकर स्कूलच्या आवारात असून बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या शिक्षणशास्त्र पदवीका (डीएड) अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 0831-2467982, 8762000973, 9341110083, 9945936948 या क्रमांकांवर संपर्क साधावा.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुशखबर
यावषी किंवा मागील वषी जे विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या मराठी टिचर्स टेनिंग कॉलेजमध्ये कमी खर्चात टीसीएच म्हणजेच डीएड करण्याची संधी उपलब्ध आहे. प्रत्येक वर्षाला फी फक्त 10,015 रुपये असून 30 नोव्हेंबर अंतिम तारीख आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी कॉलेजशी त्वरित प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोर्सचे फायदे
- कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यात शिक्षक म्हाणून उत्तम पगाराच्या नोकरीची संधी.
- कठीण विषय सोपा करून शिकविण्याच्या पद्धतींचे प्रशिक्षण मिळते.
- महिलांना अत्यंत योग्य नोकरी किंवा आपल्या परिसरात शिकवणीवर्ग घेता येतात.
- कार्यशिक्षण, चित्रकला, नृत्य, नाटय़, वक्तृत्व आणि समुपदेशन इत्यादी क्षेत्रात संधी.
- शिक्षक म्हणून काम करणाऱयांना समाजात सन्मान.
- राष्ट्र उभारणीत मोलाचा वाटा उचलल्याने समाधान.
- सतत बालगोपालांच्या सहवासात राहिल्याने तुम्ही चिरतरुण व्हाल.
- व्यक्तिमत्वाचा विकास घडविण्याची सुसंधी.
- घर, कुटुंब, समाज यावर सुसंस्कार करण्याची संधी.
- मुक्त पत्रकारिता किंवा लेखन करण्याला वाव.