प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ-उद्यमबाग रोडवर टिप्परने पार्क केलेल्या दोन दुचाकींना चिरडले. यामुळे एकच गोंधळ उडाला. टिप्पर पुढे घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने टिप्पर पदपथावर चढला. त्यामुळे दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती दक्षिण रहदारी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
अनगोळ-उद्यमबाग रस्त्यावर चुकीच्या दिशेने केए 32 सी 1117 हा टिप्पर येत होता. त्यावेळी टिप्परच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि फुटपाथवर लावलेल्या हिरोहोंडा स्प्लेंडर व एका अव्हेंचर दुचाकीला धडक दिली. यामध्ये अव्हेंचर आणि स्प्लेंडरचे नुकसान झाले आहे. सुदैवानेच मोठा अनर्थ टळला आहे.