लायब्ररीत गोष्टीची-शैक्षणिक अशी 300 पुस्तके उपलब्ध
प्रतिनिधी/ बेळगाव
शाळांना प्रारंभ झाला नसल्याने विद्यार्थ्यांचे पुस्तकांशी असलेले नाते संपुष्टात येऊ नये, या हेतूने टिळकवाडी येथे मुलांसाठी ‘बच्चा क्लब लायब्ररी’ सुरू झाली आहे. नावावरूनच हा उपक्रम बच्चे कंपनीसाठी आहे, हे स्पष्ट होते. या क्लबमध्ये मुलांसाठी इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, सामान्यज्ञान व अनेक विषयांची पुस्तके आहेत.
शीतल व दिनेश कोल्हापुरे यांनी या लायब्ररीसाठी त्यांचा मुलगा ओम कोल्हापुरे याला प्रोत्साहित केले. वास्तविक या लायब्ररीची स्थापना 2018 मध्ये झाली होती. तथापि, खऱया अर्थाने कोविडच्या लॉकडाऊन काळात ती अधिक कार्यरत झाली आहे. या लायब्ररीचा उपयोग दुर्बल घटकांतील अनेक मुलांसाठी होतो आहे. मुख्य म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
या लायब्ररीसाठी सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी गोष्टीची आणि शैक्षणिक अशी 150 हून अधिक पुस्तके दिली आहेत. याशिवाय अनेक देणगीदारांना या लायब्ररीला पुस्तके देण्यासाठी आवाहन केले आहे. अलीकडे लॉकडाऊनमुळे आणि शाळा सुरू नसल्याने बहुसंख्य मुले मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसलेली आढळतात. पालकांनी त्यांना काय पर्याय द्यावा, हे उमगत नाही. अशावेळी त्यांना पुस्तकांमध्ये गुंतवून ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. त्यातून मुलांना वाचनाची आवड लागते व त्यांच्या शैक्षणिक ज्ञानात भरही पडते. सध्या या लायब्ररीत 300 पुस्तके असून लवकरच आणखी काही पुस्तकांची भर पडण्याची शक्मयता आहे. महर्षि रोड व अयोध्यानगर टिळकवाडी येथे ही लायब्ररी सुरू आहे.