क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील बालिका आदर्श व ठळकवाडी शाळेच्या मैदानावर टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना आयोजित हनुमान स्पोर्ट्सचे संचालक अनंत सोमणाचे पुरस्कृत हनुमान चषक आंतरशालेय शिक्षकांच्या थ्रोबॉल स्पर्धेत सेंट पॉल्स, व्हॉलीबॉल स्पर्धेत टिळकवाडी अ संघाने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
पुरुषांच्या व्हॉलीबॉलमधील पहिल्या उपांत्य सामन्यात उत्तर विभागाने कॅन्टोन्मेट इंग्रजी शाळेचा 25-14, 25-14, तर दुसऱया उपांत्य सामन्यात टिळकवाडी अ संघाने कॅन्टोन्मेट मराठी शाळेचा 25-15, 18-25, 15-10 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. अंतिम लढतीत टिळकवाडी अ संघाने उत्तर विभागाचा 25-14, 25-14 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
महिलांच्या थ्रोबॉल अंतिम सामन्यात सेंट पाल्स स्कूलने डीपी स्कूलचा 21-14, 22-20 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे महानगरपालिकेचे उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक अनंत सोमणाचे, एस. के. सोसायटीचे उपाध्यक्ष एस. वाय. प्रभू, बीटा स्पोर्ट्स क्लबचे संचालक सौरभ बिर्जे, मुख्याध्यापिका नवीन शेट्टीगार, ऋतुजा जाधव, सविता जेके, गायत्री शिंदे, भैरू पाटील, डॉ. सॅवियो अब्रो, सिस्टर अन्थेनेट या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ मराठी विद्यानिकेतन व व्ही. एम. शानभाग, उत्कृष्ट कॅचर मोनिका लोबो, उत्कृष्ट थ्रोअर नीता तुक्कार, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू उमेश बेळगुंदकर, उत्कृष्ट लिफ्टर श्रीहरी लाड, उत्कृष्ट स्मॅशर बसवराज मेलीनमनी यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धाप्रमुख विवेक पाटील, चंद्रकांत पाटील, प्रवीण पाटील, जयसिंग धनाजी, बापूसाहेब देसाई, अर्जुन भेकने, उमेश बेळगुंदकर, उमेश मजुकर, बीजी सोलोमोन, रामलिंग परीट, एचबी पाटील, शांताराम कडोलकर, संतोष दळवी, पंच एस. आर. शिंगाडे, शंकर कोलकार, नागराज भगवंतण्णावर, मंजुनाथ एच., यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.