पीईओ बी. आर. मठपती यांचा स्वागत समारंभ
बेळगाव : टिळकवाडी माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे टिळकवाडी विभागातील सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकांचा सत्कार, तसेच नूतन शहर शारीरिक शिक्षणाधिकारी बी. आर. मठपती यांचा स्वागत समारंभ गुरूवार दि. 8 जुलै रोजी व्ही. एम. शानभाग शाळेच्या सभागृहात सकाळी 11 वा. आयोजित करण्यात आला आहे.
बेळगाव शहराचे नूतन शारीरिक शिक्षणाधिकारी बी. आर. मठपती यांची नियुक्ती केली गेली आहे. त्याचप्रमाणे ठळकवाडी विभागातील ज्ये÷ क्रीडा शिक्षक शांताराम कडोलकर- मालतीबाई साळुंके स्कूल, अशोक जनगौडा-गोमटेश स्कूल, व्ही. जी. पाटील- शानभाग स्कूल हे शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्तीबद्दल टिळकवाडी माध्यमिक क्रीडा शिक्षक संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सरकारी अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील सर्व क्रीडा शिक्षकांनी या समारंभास हजर रहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.