प्रतिनिधी/ सातारा
रायगाव (ता. जावली) येथील टीआर कार्पोरेशन कंपनीत मर्ढे येथील राजेश धुमाळ हा दारु पिऊन कामावर येत असल्याने त्यास कामावर येवू नको असे म्हणल्याच्या कारणावरुन चिडून जाऊन त्याने व त्याच्या दोन मित्रांनी कंपनीच्या गेटवर अडवून बॅट, लोख्ंाडी रॉड आणि दांडक्याने कंपनीचा मालक महेश शिवाजी सोनावणे (वय 29, रा. एमआयडीसी सातारा) याला बेदम मारहाण केली. त्याप्रकरणी तिघांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिसांनी देलेली माहिती अशी की, महेश सोनावणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार मी सुमारे 3 महिन्यापुर्वी रायगगाव (ता. जावली) येथील प्लॉट नं 462 या ठिकाणी अमोल भरत सांळुखे (रा. अमरलक्ष्मी कोडाली) याच्यासोबत भागीदारीत टीआर कार्पोरेशन युनिट-2 नावाची कॉपर कास्टिंग कंपनी सुरु केली आहे. त्या कंपनीत 12 कामगार काम करत आहेत. त्या कंपनीत राजेश धुमाळ हा कामगार सुमारे 1 वर्षापासुन काम करीत आहे. त्याला दारुचे व्यसन असल्याने तो वांरवार दारु पिऊन कामावर येत होता. त्यामुळे दोन दिवसापूर्वी राजेश धुमाळ यास सोनावणे याने तू दारु पिऊन कामावर येऊ नको असे सांगुन त्याला कंपनीतून बाहेर काढले होते. त्यामुळे तो चिडुन होता. दि. 14 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सोनावणे हा कंपनीत गेला असता त्यावेळी कंपनीच्या गेटच्या आत शटरजवळ राजेश धुमाळ, साहिल गोरे (पुर्ण नाव माहिती नाही) व आणखी एक अनोळखी तरुण असे तिघेजण उभे होते. कंपनीच्या शटरजवळ सोनावणे हा गेला असता राजेश धुमाळ याने अडवले व तू मला कामावरुन का काढले असे म्हणुन तो सोनावणे याला शिवीगाळ करु लागला. त्यावेळी सोनावणे त्याला म्हणाला की तुला वांरवार समजावून सांगून देखील दारु पिऊन कामावर येतो. त्यामुळे कंपनीच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे तुला कामावरुन काढुन टाकले आहे असे म्हटले. त्यावेळी त्यातील साहिल हा म्हणाला की, तू आमच्या गावात कोणाला विचारुन कंपनी टाकली, आमच्या गावात कंपनी चालू करुन आमचे माणसांना कामावरुन का काढुन टाकतो. आमच्या गावात कंपनी चालावयाची असेल तर तुला आम्हाला दरमहा पैसे द्यावे लागतील. त्यावेळी सोनावणे याने तुम्हाला मी कसलेही पैसे देणार नाही असे म्हणाला असता साहील याने त्याच्या हातातील बॅट सोनावणे याच्या मानेवरती मारली, त्यांनतर सोनावणे हा तेथुन पळु लागला. त्यावेळी राजेश धुमाळ याने सोनावणेला ढकलुन खाली पाडले व त्यावेळी साहिलने तेथे पडलेले दांडके उचलुन सोनावणेच्या डोक्यात मारले व धुमाळने रॉड डोक्यात मारला. तिसऱया व्यक्तीने लाथा बुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी सोनावणे हा खाली पडलेला असताना धुमाळ याने त्याच्या खिशातील 80 हजार 400 रुपये जबरदस्तीने काढुन घेतले. त्यानंतर सोनावणे याने तेथुन कशीतरी स्वतःची सुटका करुन घेऊन तेथुन पळुन कंपनीच्या पाठीमागील अश्विनी पॅकेजिंग कंपनीत सोनावणे गेला. त्याठिकाणी तेथील कामगांरानी सोनावणेला पिण्यास पाणी दिले व त्यानंतर त्या कंपनीचे मालक विक्रम पाटील याने त्याच्या स्वीप्टमधुन खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.