मोटिव्हेशनल पोस्ट अभिनेत्रीकडून शेअर
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर सक्रीय असते. स्वतःच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत ती चाहत्यांना प्रोत्साहन देत असते. तिने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर अमेरिकेचे संशोधक ब्रेन ब्राउन यांचे एक वाक्य शेअर केले आहे.
अमेरिकन संशोधकाचे कोट्स शेअर करत आलियाने “टीका म्हणजे कमकुवतपणा नसतो, हे आमच्या साहसाचे सर्वात अचूक मापदंड असते’’ असे नमूद केले आहे. आलियाने यापूर्वी देखील चाहत्यांसोबत बळ वाढविणारे कोट्स आणि उदाहरणे शेअर केली आहेत. अलिकडेच तिने आर्थर ऐशा यांचे फेमस कोट्स ‘जेथे असाल तेथूनच सुरुवात करा, जे तुमच्याकडे आहे, त्याचा वापर करा. जे करू शकता ते करा’ शेअर केले होते.
आलिया लवकरच संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये दिसून येणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध लेखक हुसैन जैदी यांचे पुस्तक माफिया क्वीनवर बेतलेला आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण देखील झळकणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारीत प्रदर्शित केला जाऊ शकतो. याचबरोबर आलिया ही एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनाखाली तयार आरआरआर चित्रपटात दक्षिणेचा स्टार ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. अयान मुखर्जीचा चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’मध्ये ती प्रियकर रणवीर कपूरसोबत झळकणार आहे.