कंपनीच्या इलेक्ट्रीशियननेच दाबले ड्रायरचे बटण
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथील टीजे मरीन कंपनीमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी तिघांवर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल़ा पोलिसांच्या चौकशीत कंपनीमध्ये काम करणाऱया इलेक्ट्रिशियनने ड्रायरचे बटण दाबल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आल़े या प्रकरणी कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इलेक्ट्रिशिन संदीप सोना सनगरे (35, वांद्री त़ा संगमेश्वर), सुपरवायझर विक्रांत विभाकर पवार (फणसवळे रत्नागिरी) व कंपनीचे व्यवस्थापक महम्मद उमर (कुवारबाव रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ सुरूवातीला आपल्याला काहीही माहिती नसल्याचा आव या संशयितांकडून आणण्यात आला होत़ा मात्र पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता सर्व प्रकार उघडकीस आल़ा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी टिजे मरीन या कंपनीत ड्रायरच्या साफसफाईचे काम सुरु होत़े यावेळी संतोष विश्राम घवाळी (43, पानवल घवाळीवाडी) व सुमित अनंत पांचाळ (25, कुवारवाब, रत्नागिरी) हे ड्रायरमध्ये उतरून साफसफाई करत होत़े दुपारी साडेतीनच्या सुमारास काम अंतिम टप्प्यात असताना अचानक ड्रायर सुरु झाला. यामध्ये संतोषचा ड्रायरमध्ये अडकून मृत्यू झाला तर सुमित गंभीर जखमी झाला होत़ा
पोलीस तपासामध्ये ड्रायर मशीन अचानक सुरु होण्याच्या कारणाची स्पष्टता येत नव्हत़ी यासाठी पोलिसांकडून कर्मचाऱयांची उलटतपासणी सुरु केल़ी प्रारंभी सर्वांनीच आपल्याला काही माहित नसल्याचा आव आणला. मात्र पोलिसांनी खास तंत्र वापरून बोलते केल्यानंतर कंपनीमध्ये काम करणाऱया इलेक्ट्रिशियनने बटन दाबल्याने ड्रायर सुरु होवून हा अपघात घडल्याची धक्कादायक बाब समोर आल़ी कंपनीचे सुपरवायझर व मॅनेजर यांनीही कामामध्ये निष्काळजीपणा दाखवल्याचे तपासामध्ये स्पष्ट झाले. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद भितळे यांनी संशयित आरोपिंविरूद्ध तक्रार दाखल केल़ी त्यानुसार संशयित आरोपींविरूद्ध भादंवि कलम 304 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुह्याचा पुढील तपास ग्रामीण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत़