मार्च महिन्यात तब्बल 7 कोटी 31 लाखांचा महसूल जमा
संजीव खाडे/कोल्हापूर
महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने (टीपी ः टाऊन प्लॅनिंग) 2020-2021 या कोरोनाच्या संकटकाळातील आर्थिक वर्षात शेवटच्या महिन्यात वेगवान कामगिरी करत महापालिकेची तिजोरी भरण्यास चांगलाच हातभार लावला आहे. एप्रिल 2020 ते मार्च 2021 या बारा महिन्यांच्या काळात 21 कोटी 29 लाख 40 हजार 211 रूपये इतका महसूल नगररचना विभागाने महापालिकेला मिळवून दिला. विशेष म्हणजे या महसुलापैकी 7 कोटी 31 लाख 85 हजार 928 रूपयांचा महसूल हा केवळ मार्च महिन्यातील आहे. वास्तविक नगररचना विभागाला 40 कोटींचे उद्दीष्ट होते. कोरोनाने हे उद्दीष्ट धोक्यात आणले होते. पण शेवटच्या चार पाच महिन्यात उद्दीष्टाच्या पन्नास एकावन्न टक्यांपर्यंत महसूल मिळविण्यात नगररचना विभागाला यश आले आहे.
गतवर्षी कोरोनाची पहिली लाट आली तेंव्हा इतर व्यवहाराप्रमाणे बांधकाम क्षेत्रही ठप्प झाले. नवीन बांधकाम परवानगी घेण्याकडे बांधकाम व्यावसायिकांचा कल कमी झाला. त्यामुळे नगररचना विभागाच्या महसूल निर्मितीचा स्त्रोत धोक्यात आला होता. 40 कोटींचे महसूल संकलनाचे उद्दीष्ट कसे गाठायचे? असा नगररचना विभागाचे अधिकाऱयांपुढे निर्माण झाला होता. एप्रिल ते ऑक्टोबर पर्यंतचा काळ शांततेत गेला. नोव्हेंबरनंतर बांधकाम क्षेत्राने गती घेण्यास प्रारंभ केल्यानंतर नवनवीन प्रकल्प मंजुरीसाठी येऊ लागले. स्टॅपडÎुटीत असणारी सवलत, डिसेंबरच्या मध्यानंतर आलेले युनिफाईड बायलॉज यामुळे नवीन बांधकाम परवान्यासाठी प्रकल्पांच्या फाईल्सची संख्या वाढू लागली. मार्चच्या 18 तारखेला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नगररचना विभागाच्या कामात सुसूत्रता यावी, मंजुरीची प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी 1 हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांची परवानगी देण्याचे अधिकारी उपशहर रचनाकारांकडे दिले. तसेच एक हजार चौरस फुटापर्यंतच्या मर्यादीत पेडअप प्रिमिअम आकारणी आणि ऍनसिलरी एफ.एस.आय प्रिमिअम आकारणीचे अधिकारही उपशहर रचनाकारांना देण्यात आले. 1000 ते 4000 चौरस फुटापर्यंतच्या बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार सहाय्यक संचालक नगरचना विभाग यांच्याकडे दिले. याचा सकारात्मक परिणाम झाला. मार्च महिन्यात तब्बल 7 कोटी 31 लाख 85 हजार 928 रूपयांचा महसुल बांधकाम परवानगीतून मिळाला. त्यामध्ये 31 मार्च या एकाच दिवशी 1 कोटी 18 हजार 576 रूपयांच्या महसुलाचाही समावेश आहे. बांधकाम परवान्यासाठी आलेल्या 1177 फाईल्स पैकी 1035 फाईल्सना मंजुरी देण्यात आली.
मतदार याद्यांच्या कामाचा नगररचनाला फटका
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या तयार करण्याचे काम फेब्रुवारी आणि मार्चच्या मध्यापर्यंत सुरू होते. त्या कामात नगररचना विभागाच्या अधिकारी, ज्युनिअर इंजिनिअरसह कर्मचाऱयांचा समावेश करण्यात आल्याने बांधकाम फाईल मंजुरीच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे अनेक फाईल मंजुरीविना राहिल्या. त्याचा फटका आर्थिक वर्षांतील महसूल संकलनावर झाला.
18 ते 31 मार्च काळात गती
नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन आणि उपशहर नगररचनाकार रमेश मस्कर यांनी 18 मार्च रोजी प्रशासकांनी दिलेल्या मंजुरीच्या अधिकारांचा वापर करत बांधकाम मंजुरीची प्रक्रिया वेगाने राबविल्याने महसूल संकलन सुलभ झाले.
एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षात 21 कोटी 29 लाख 40 हजार 211 रूपये इतका महसूल मिळाला. अजूनही मोठे तीन चार प्रोजेक्ट आहेत, त्यातून 8 कोटी महसूल मिळाला असता. पण ते प्रोजेक्ट मोठे असल्याने फाईल मंजुरीला काही काळ लागणार आहे. –रमेश मस्कर, उपशहर नगररचनाकार, नगररचना विभाग, कोल्हापूर महापालिका
असा झाले नगररचना विभागाचे महसूल संकलन
(कालावधी ः एप्रिल 2020 ते मार्च 2021 ः रक्कम रूपयांत)
महिना करासह रक्कम अनामत रक्कम एकूण
एप्रिल 21,44233 4,80820 2625053
मे 54,76949 30,30880 85,07829
जून 63,98976 40,59385 1,0458361
जुलै 1,4026798 39,36239 1,7963037
ऑगस्ट 1,0838191 41,29376 1,4967567
सप्टेंबर 1,2943155 38,64953 1,6808108
ऑक्टोबर 66,11632 46,25567 1,1237199
नोव्हेंबर 67,63787 44,35064 1,1198851
डिसेंबर 85,83312 35,86011 1,2169323
जानेवारी 2,2246166 16,81410 2,3927576
फेब्रुवारी 98,35471 55,909 98,91380
मार्च 6,2449320 7,18032 63167352
(टीप ः मार्च महिन्याची एकूण रक्कम 30 मार्च पर्यंतची आहे. 31 मार्चला 1 कोटी 18 लाख 576 रूपये जमा झाले. त्यामुळे मार्च महिन्याची एकूण रक्कम होते. 7 कोटी 31 लाख 85 हजार 928 रूपये )