मुंबई
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने 1 लाखहून अधिक एनटॉर्क 125 या दुचाकींची आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात केली आहे. ब्लुटुथची सोय असणारी ही गाडी सध्या चांगलीच मागणीत दिसते आहे. भारतात अशाप्रकारची पहिलीच गाडी सादर करण्याचा मान टीव्हीएसला जातो. भारतात निर्मिती केलेल्या या गाडीने आंतरराष्ट्रीय बाजारात वाढीव मागणी नोंदवली आहे. दक्षिण आशिया, लॅटीन अमेरिका, मध्य आशिया यासह 19 देशांमध्ये गाडी दाखल करण्यात आली आहे.