वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टीव्हीएसने आपली नवी एनटॉर्क 125 स्कूटर नुकतीच बाजारात सादर केली आहे. तिची किंमत 77 हजार 865 (एक्सशोरूम-नवी दिल्ली) इतकी असणार आहे.
मार्व्हल्स एव्हेंजर्सथीमवर ही गाडी सादर करण्यात आली आहे. येणाऱया दसरा-दिवाळीसाठी कंपनीने आपली नवी गाडी महिला ग्राहकांकरीता खास करून सादर केली आहे. 125 सीसीच्या गटात एनटॉर्क ही गाडी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे. स्पेशल एडिशन अंतर्गत दाखल झालेल्या या गाडीला एलइडी हेडलॅम्प आहे. ब्ल्यू टूथ कनेक्टीव्हीटीची सोय या गाडीत असून 125 सुपरस्कॉड प्रणालीची जोड आहे. या मॉडेललाही ग्राहकांची मोठी पसंती मिळणार असल्याचा विश्वास टीव्हीएस मोटारचे कम्युटर मोटारसायकल, स्कूटर विभागाचे उपाध्यक्ष अनिरुद्ध हल्दर यांनी व्यक्त केला आहे.