आयक्यूब-ज्युपिटर 125 सीसी दुचाकीही दाखल : वाहन निर्मिती क्षेत्रात मोठे बदल अपेक्षित
प्रतिनिधी /बेळगाव
टीव्हीएसच्या दोन नव्या दुचाकीचा शुभारंभ मंगळवारी झाला. टीक्हीएस आयक्यूब ही इलेक्ट्रीक तर टीक्हीएस 125 या दुचाकीचा शुभारंभ जुना धारवाड रोड (पिंपळकट्टा) येथील हायटेक मोटर्स ऍण्ड ऑटोमोबाईल येथे झाला. गुन्हे तपास विभाग विभागाच्या उपायुक्त डॉ. पी. व्ही. स्नेहा व जीएसएस कॉलेजच्या माजी प्राचार्या प्रा. माधुरी शानभाग यांच्या हस्ते दुचाकीचा शुभारंभ करण्यात आला.
डॉ. पी. व्ही. स्नेहा यांनी हायटेक मोटर्स ऍण्ड ऑटोमोबाईलचे अभिनंदन करीत इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणल्याबद्दल कौतूक केले. तसेच ग्राहकांनी वाहतूकीच्या सर्व नियमांचे पालन करावे असे सांगितले. प्रा. माधुरी शानभाग यांनी इलेक्ट्रिक व्हेईकलमुळे वाहन निर्मिती क्षेत्रात मोठे बद होणार असल्याचे नमूद केले.
हायटेक मोटर्स ऍण्ड ऑटोमोबाईलचे संचालक राजेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले. संचालक विनयकुमार बाळीकाई यांनी हायटेक ग्रुपच्या प्रगतीविषयी माहिती दिली. संचालक राजेश बोसगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. टीव्हीएसचे सेल्स मॅनेजर सय्यद इप्तीकर यांनी टीव्हीएस कंपनीविषयी माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते पहिला ग्राहक ज्योती परीट यांना दुचाकीच्या चाव्या देण्यात आल्या. संचालक बसवराज तंगडी यांच्यासह टीव्हीएस कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.
काय आहे विशेष
दुचाकी वाहन निर्मिती क्षेत्रात टीव्हीएसने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यामुळे आजवर लाखो वाहनांची विक्री झाली असून, ग्राहक समाधानी आहेत. आयक्मयूब या इलेक्ट्रीक गाडीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 75 कि. मी. दुचाकी धावू शकते. टॉप स्पीड ताशी 78 कि. मी. आहे. याचसोबत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली ज्युपीटर दुचाकी आता 125 सीसीमध्ये बेळगावमध्ये उपलब्ध झाली आहे.