नवी दिल्ली
टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या व्यवसायासाठी तांत्रिक सल्लागारपदी प्रा. वेंकट विश्वनाथन यांची नियुक्तीची घोषणा केली आहे. ते कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीत सध्याला असोसिएट प्रोफेसर म्हणून मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागात कार्यरत आहेत. बॅटरी तंत्रज्ञान विकासाला यांचे मार्गदर्शन आगामी काळात मोलाचे ठरणार आहे. टीव्हीएस मोटर कंपनीत सहभागी होता येत असल्याचा आपल्याला सखेद आनंद होत असून आपण आवश्यक ते सहकार्य पुढील काळात करणार असल्याचे विश्वनाथन यांनी सांगितले.