नवी दिल्ली : दुचाकी तीनचाकी वाहनांची निर्मिती करणाऱया भारतामधील टीव्हीएस फर्ममध्ये बीएमडब्लू मोटारसायकलचे 17 टक्के उत्पादन घेतले जात आहे. सदरचे उत्पादन हे भारतामधील टीव्हीएसच्या होसूर येथील कारखान्यात घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येते.
मी माझ्या जीवनात इतक्या साऱया दुचाकी याअगोदर कधीच पाहिल्या नसल्याचे टीव्हीएस मोटारच्या प्रकल्प भेटीवेळी जर्मनीचे वाणिज्यदूत कॅरिन स्टोल यांनी सोशल मीडिया पोस्ट्मध्ये म्हटले आहे. इंडोजर्मन टेक्नॉलॉजी आणि निर्मिती भागीदारीमुळे नवीन सकारात्मक बदल पहावयास मिळत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये तामिळनाडू येथील होसूरमधील टीव्हीएस मोटार कंपनीचा प्रकल्प हा अन्य प्रकल्पांपैकी एक असल्याचेही यादरम्यान म्हटले आहे. या कारखान्यातच बीएमडब्ल्यू मोटारसायकलींचे उत्पादन घेतले जात आहे.
310 सीसी गाडय़ांच्या उत्पादनास प्रारंभ
टीव्हीएस मोटार आणि बीएमडब्लू यांनी 2013 मध्ये एक करार केला होता. त्या करारानुसार 250 ते 500 सीसीच्या मोटारसायकलांचे उत्पादन एकत्रितपणे सुरु करण्यासाठी नेटवर्क उभारणीवर चर्चा केली होती. कंपनीने सध्या 310 सीसी क्षमतेच्या मोटारसायकलचे उत्पादन घेण्यास प्रारंभ केला आहे.
जूनपासून 72 हजारहून अधिक बीएमडब्लू
भागीदारीतून 310 सीसी मोटारसायकलची आणि इंजिनची निर्मिती एकत्रितपणे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. जून 2020पासून तब्बल 72,000 पेक्षा अधिक बीएमडब्लू मोटरसायकल्सची निर्मिती केली आहे.
केल्याची माहिती आहे.