वृत्तसंस्था /होसुर :
ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टीव्हीएस मोटर्सच्या एकूण वाहन विक्रीत ऑगस्टमध्ये 14 टक्के इतकी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते. कंपनीसाठी ऑगस्ट महिला हा एकाअर्थी दिलासा देणारा ठरला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
कंपनीने ऑगस्ट 2020 मध्ये 2 लाख 87 हजार 398 वाहनांची एकंदर विक्री केली आहे. जी मागच्या जुलैमध्ये 2 लाख 52 हजार 744 इतकी नोंदली गेली होती. मागच्या वषी ऑगस्टमध्ये कंपनीने 2 लाख 90 हजार 455 इतक्मया वाहनांची विक्री केली होती. दुचाकींचा ऑगस्ट 2020 मधील विक्रीतला वाटा 2 लाख 77 हजार 226 इतका होता. तर याच महिन्यात कंपनीने 10 हजार 172 तिचाकींची विक्री केली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये कंपनीने 14 हजार 604 तिचाकींची विक्री केली होती. कंपनीने ऑगस्टमध्ये 87 हजार 44 स्कुटर्सची विक्री केली आहे. हीच विक्री मागच्या वषी याच महिन्यात 1 लाख 9 हजार 393 इतकी होती. ऑगस्ट 2020मध्ये कंपनीने 58 हजार 888 दुचाकींची निर्यात केली आहे. कंपनीच्या दुचाकी आणि तिचाकींना स्थानिक बाजारात बऱयापैकी मागणी असून निर्यातही चांगली होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. लोकांचा विश्वास संपादन करण्यात कंपनी यशस्वी ठरते आहे. अंदाजे 60 हून अधिक देशांमध्ये कंपनी आपली सेवा याघडीला देत आहे. येणाऱया उत्सवी काळाकरीता कंपनीने आपली तयारी चालवली असल्याचे सांगण्यात येते.