होसूर
: सध्याच्या घडीला कोरोनाच्या धास्तीने ऑटोमोबाईल उद्योगही संथपणे वाटचाल करत असून अनेक कंपन्यांना जुलैमध्ये विक्रीत म्हणावी तशी प्रगती साधता आली नाही. पण मोटारसायकल, स्कुटर क्षेत्रातील कंपनी टीव्हीएसने मात्र जुलैमध्ये विक्रीत 27 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. जून 2020 मध्ये 1 लाख 98 हजार 387 इतकी विक्री झाली होती, पण जुलैमध्ये ती 2 लाख 52 हजार 744 इतकी होती. जुलै 2019 मध्ये टीव्हीएसने 2 लाख 79 हजार 465 गाडय़ांची विक्री केली होती. कंपनीची दुचाकींची जुलै 2020 मधील विक्री 2 लाख 43 हजार 788 इतकी होती. यात पुन्हा मोटारसायकलचा वाटा 1 लाख 6 हजार 62 आणि स्कुटर्सचा विक्रीतला वाटा 78 हजार 603 इतका होता.
जुलै 2019 मध्ये 2 लाख 65 हजार 679 गाडय़ा विक्री झाल्या होत्या. कंपनीने दुसरीकडे जुलै 2020 मध्ये 62 हजार 389 गाडय़ांची निर्यात केली आहे.