वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टीव्हीएस मोटार कंपनीने शुक्रवारी आपल्या ग्राहकांसाठी ऍपचे सादरीकरण केले आहे. सदर ऍपच्या मदतीने ग्राहकांना ऑनलाईनच्या सुविधेच्या आधारे कोणत्याही मॉडेलची माहिती घेण्यासोबत खरेदी विक्रीसाठी सक्षम बनविण्याकडे पावले उचलण्यात येत असल्याची माहिती आहे.
कंपनेने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार टीव्हीएस ऑगमेंटेड रियलिटी इंटरऍक्टिव्ह व्हेईकल एक्सपीरियन्स (एआरआयव्हीइ) ऍपच्या मदतीने ग्राहकांना टीव्हीएसची नवनवीन उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. हे ऍप सुरुवातीला फक्त प्रमुख मॉडेल टीव्हीएस अपाचे आरआर 310 आणि टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 4 वी ची माहिती देणार असून त्यानंतर काही प्रमाणात सर्व उत्पादने या ऍपला जोडणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.