करवीर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी शंकर यादव यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
महापालिका प्राथमिक शिक्षण विभाग आणि करवीर पंचायत समिती प्राथमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. 9)पासून माझा टीव्हीवर `माझी शाळा शैक्षणिक मालिका’ सुरू होणार आहे, अशी माहिती करवीर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी शंकर यादव यांनी दिली आहे.
विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यासाठी टीव्ही चॅनेलवर शैक्षणिक मालिका सुरू करण्यात येणार आहे. आज सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात भाषा आणि गणित पेपर एक विषयाचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
दुपारी 12.31 ते 2 या वेळेत इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात भाषा व गणित पेपर एक विषयाचे मार्गदर्शन केले जाणार आहे. मंगळवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत इयत्ता पाचवी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात बुध्दिमत्ता चाचणी व इंग्रजी पेपर दोन विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. दुपारी 12.31 ते 2 या वेळेत इयत्ता आठवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात बुध्दिमत्ता चाचणी व इंग्रजी पेपर दोन विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.