मार्च तिमाहीमधील आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मीडिया कंपनी टीव्ही 18 ब्रॉडकास्टचा निव्वळ नफा हा मागील आर्थिक वर्षातील मार्चमध्ये समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीत जवळपास 77.3 टक्क्यांनी वाढून 251.08 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. या अगोदरच्या वर्षातील समान तिमाहीत कंपनीने 141.83 कोटी रुपयाचा निव्वळ नफा कमावला होता.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार तिमाहीच्या दरम्यान एकूण उत्पन्न हे 5.4 टक्क्यांनी घटून 1,374.94 कोटी रुपये राहिले आहे. तिमाहीच्या दरम्यान कंपनीचा एकूण खर्च हा 11.3 टक्क्यांनी घटून 1,113.32 कोटीच्या घरात राहिला आहे. जो मागच्या आर्थिक वर्षातील समान तिमाहीत 1,254.89 कोटीवर राहिला होता.
संपूर्ण आर्थिक वर्षात 2020-21 मध्ये टीव्ही 18 ब्रॉडकास्टचा निव्वळ लाभ 78.95 टक्क्यांनी वाढून 745.71 कोटी रुपयावर आला आहे. जो या अगोदरच्या आर्थिक वर्षात 416.71 कोटीच्या घरात राहिला होता.