वृत्तसंस्था/ मुंबई
सर्वात सुस्त समजल्या जाणाऱया ऑक्टोंबर ते डिसेंबरच्या तिमाहीत टीसीएस कंपनीने चांगली कामगिरी पार पाडली आहे. तिमाहीत महसूल आणि नफा दोन्हीही वाढवण्यात कंपनीला यश आलं आहे.
सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेमध्ये यांचा एकत्रित महसूल डिसेंबरला संपलेल्या तिमाहीत 4 टक्के इतका वाढला आहे. गेल्या नऊ वर्षातली ही सर्वाधिक तेजी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचा महसूल 5.4 टक्के आणि नफा 7.2 टक्के इतका वाढीव राहिला आहे. या तिमाहीमध्ये कंपनीने 42 हजार 15 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे, ज्यातून 8701 कोटी रुपये नफा कंपनीने मिळवला आहे. 2019 मध्ये तिमाहीत 8118 कोटी रुपये नफा कमावला होता. टीसीएस ही देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी आहे. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये कंपनीने 15 हजार 721 कर्मचाऱयांची भरती केली आहे. कंपनीत सध्या 4 लाख 69 हजार 961 इतके कर्मचारी सेवा बजावत आहेत तर कंपनीत महिला कर्मचाऱयांची संख्या 36 टक्के इतकी आहे.