नवी दिल्ली
देशातील दिग्गज आयटी क्षेत्रातील कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)चे सीईओ राजेश गोपिनाथन यांना 2020-21 सालाकरीता 20.36 कोटींचे वेतनाचे पॅकेज प्राप्त झाले असून 2019-20 च्या तुलनेत वेतन पॅकेजमध्ये 15 टक्के घट झाली आहे.
टीसीएसच्या 2020-21 च्या वार्षिक अहवालानुसार राजेश गोपिनाथन यांना 1.27 कोटी रुपये वेतनरुपात, 2.09 कोटी अलौन्स व इतर तसेच 17 कोटी रुपये कमिशन रुपात प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. याआधीच्या म्हणजेच 2019-20 आर्थिक वर्षात सीईओ राजेश गोपिनाथन यांना एकूण मानधन 13.3 कोटी इतके प्राप्त झाले होते. व्यवस्थापनीय मानधनात यावर्षी 55 टक्के इतकी वाढ केली आहे.