कंपनीकडून बायबॅक प्रस्तावास हिरवा कंदील : नफ्यात 7.05 टक्क्यांची घट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएसने नुकतेच आपले सप्टेंबर तिमाहीतील नफा कमाईचे आकडे सादर केले आहेत. यामध्ये कंपनीचा निव्वळ लाभ हा 7.05 टक्क्मयांनी घटून 7,475 कोटींवर राहिला आहे. जो मागील वर्षातील समान कालावधीत 8,042 कोटी रुपयांवर राहिला होता.
सदरचा अहवाल सादर करण्यासोबतच कंपनीच्या मंडळाने 16,000 कोटी रुपयांच्या समभाग बायबॅकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सोबत टीसीएस आर्थिक वर्ष 21 मध्ये आपल्या समभागांची खरेदी करणारी पहिली टेक्नॉलॉजी कंपनी म्हणून ओळख निर्माण करणार आहे. कंपनीने 2018 मध्ये बायबॅक आताच्या रक्कमेइतकेच केले होते.
कंपनीच्या नफ्यावर इपीआयसी सिस्टम कॉर्पोरेशन संदर्भात करण्यात आलेल्या 1,218 कोटी रुपयांच्या तरतूदीचा परिणाम पहावयास मिळत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. परंतु कंपनीची ऍडजस्ट नफ्यातील वाढ ही 20.3 टक्क्मयांनी मजबूत होत सोबत 8,433 कोटी रुपयांवर राहिली आहे.
बाजारमूल्यात तेजी
टीसीएसचे बाजारमूल्य 2.44 लाख कोटी रुपयांनी वाढून 10.20 लाख कोटी झाले आहे. तसेच जानेवारीत कंपनीचे बाजारमूल्य हे 7.76 लाख कोटी होते. तेव्हापासून कंपनीने चांगली मजल मारली आहे. गुरूवारी शेअर बाजारात समभाग 3 टक्के वाढले होते.