वर्षअखेरीपर्यंत कंपनीची डॉयशसोबत चर्चा सुरु
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टीसीएस) डॉयश बँकेचे टेक्नॉलॉजी युनिट खरेदी करण्याचे संकेत आहेत. यासंदर्भात सध्या दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. यामुळे सदरचा व्यवहार हा चालू वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भविष्यात हा व्यवहार यशस्वी झाल्यास टीसेएसला भक्कम सोबती मिळण्याचा अंदाज आहे. टीसीएसला नवीन प्लॅटफॉर्म मिळण्याच्या अपेक्षेमुळे टीसीएसचे समभाग गुरुवारी सकाळी काही प्रमाणात तेजी नेंदवत 2,673 रुपये मूल्यावर राहिले होते.
व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवहाराचा सौदा निश्चित करण्यासाठी दोन्हींकडून चर्चा केली जात आहे. यामुळे काही प्रमाणात हा व्यवहार लांबणार असून तो वर्षाअखेरीस होणार असल्याची शक्यता आहे.
सर्वाधिक सॉफ्टवेअर निर्यात
बाजारमूल्याच्या आधारे टीसीएस आशियातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यात करणारी कंपनी आहे. नव्या व्यवहारानंतर आपल्या पुढील कार्यासाठी कंपनी अधिक विस्ताराने प्रयत्न करणार असल्याचे समजते.